Chandal Choukadichya Karamati Marathi Web Series Actor Bharat Shinde Biography

बाळासाहेब म्हणजे हभप भरत महाराज शिंदे हे नक्की कोण आहेत? जाणून घ्या..

महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वेब सिरीज (Marathi Web Series) मधील एक कलाकार सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर गेला आहे. या लोकप्रिय कलाकाराचे नाव म्हणजे हभप भरत महाराज शिंदे. भरत महाराज शिंदे (Bharat Shinde) म्हणजे नक्की कोण? भरत शिंदे म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून चांडाळ चौकडीच्या करामती (Chandal Choukadichya Karamati) या वेब सिरीजचे दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. गावरान फिल्म्स प्रोडक्शन (Gavran Films Production) प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील बाळासाहेबची (Balasaheb) भूमिका करणारे व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख आहे ते आहेत हभप भरत महाराज शिंदे.

Balasaheb aka Marathi Actor Bharat Shinde

हभप भरत महाराज शिंदे ते बाळासाहेब (Bharat Shinde Balsaheb):

बाळासाहेब म्हणजे नक्की कोण? यांच्या बद्दल विशेष अशी माहिती देण्याची कसलीच गरज नाही कारण आज आपल्या महाराष्ट्रासोबतच जगाच्या पाठीवर जिथं जिथं मराठी माणूस राहतो तिथं पर्यंत या कलाकाराची कीर्ती हि सांगण्या अगोदरच पोहचली आहे. बाळासाहेबांच्या हटके अनुभवमुळे हे तमाम मराठी रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या सारख्या दारुड्याचा अभिनय आजवर मराठी चित्रपटश्रुष्टीत इतर कोणीही कलाकार करू शकला नाही.

Chandal Choukadichya Karamati Marathi Web Series Balasaheb aka Marathi Actor Bharat Shinde

प्रेक्षकांचे लाडके बाळासाहेब म्हणजेच हभप भरत महाराज शिंदे हे कंबळेश्वर, ता.बारामती, जि.पुणे येथील माजी सरपंच आहेत आणि वंदनीय बंड्यातात्या कराडकर यांचे पटशिष्य आहेत.

बाळासाहेबांचे शिक्षण हे बारावी पर्यंत झालं आहे आणि शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. बाळासाहेबांच्या पत्नी सौ.दुर्गा ताई या गृहिणी आहेत आणि त्यांना दोन मुलीही आहेत.

Balsaheb aka Bharat Shinde Biography, Family

पटनाट्याच्या माध्यमातून गावोगावी जाऊन आणि विविध कार्यक्रमात त्यांनी व्यसनमुक्ती हा विषय प्रभोधनातून लोकांपुढे मांडला आहे. सर्वांचे लाडके बाळासाहेब त्यांचा खऱ्या आयुष्यात सुपारीचे खांड सुद्धा खात नाहीत.

Balsaheb aka Bharat Maharaj Shinde Wikipedia, Serial

पोस्ट मचकूर साभार – करामती फॅन्स क्लब युट्युब चॅनेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *