Rocky Aur Rani Ki Prem Kahani Movie Poster, Photo, Images, Release Date, Teaser, Cast

Karan Johar announces next film, ‘Rocky Aur Rani Ki Prem Kahani’

रणवीर सिंह (Ranveer Singh) , आलिया भट्ट (Alia Bhatt), धर्मेंद्र (Dharmendra), जया बच्चन (Jaya Bachchan) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) सारखी भरभक्कम टीम सोबत नवीन चित्रपट ’रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Pream Kahani) घेऊन येत आहे करण जोहर (Karan Johar)

तब्बल 5 वर्षानंतर करण जोहर ने दिग्दर्शकाची सूत्रे हाती घेतली आहेत. बळकट कलाकारांच्या टोळी सह करण जोहर घेऊन येत आहे आपला नवीन चित्रपट ज्याचे नाव आहे, ’रॉकी और रानी की प्रेम कहानी’.(Rocky Aur Rani Ki Prem Kahani)

आज आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून करण जोहर ने नवीन चित्रपटाच्या घोषणे सह या चित्रपटात रणवीर सिंह , आलिया भट्ट , धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत असल्याची माहिती दिली आहे. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने ही भरभक्कम टीम पडद्यावर एकत्रित दिसणार आहे.

करण जोहर दिग्दर्शित, हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व मेहता (Apoorva Mehta) द्वारा निर्मित , या चित्रपटाचा स्टुडिओ पार्टनर Viacom18 आहे. या चित्रपटाचे संवाद इशिता मोइत्रा यांचे असून , कथा इशिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिलेली आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani First Look

Video Credit – Filmy Professor Youtube Channel

https://youtu.be/0sm9bRij3MM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *