हिंदी, मराठी सिनेमांमध्ये आणि हिंदी टेलिव्हिजनमध्ये अभिनेत्री रीना मधुकरने (Reena Madhukar) वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन देखील झालेच पण त्यांना तिच्या हर एक भूमिकेत नाविन्य पाहायला मिळालं… म्हणूनच रीनाचे फॅन्स तिच्यावर आणि तिच्या भूमिकांवर जीवापाड प्रेम करतात.
Man Udu Udu Jhala Fame Actress Reena Madhukar Received Best Wishes:
आपल्या मराठमोळ्या रीनाने तिच्या अभिनयाची सुरुवात जरी हिंदी मधून केली असली तरी हिंदी आणि मराठी या दोन्ही इंडस्ट्री सोबत तिने एक छान नातं जपलं आहे आणि त्याचा अनुभव नुकताच सर्वांनी अनुभवला जेव्हा रीनाच्या पहिल्या मराठी मालिकेला म्हणजेच ‘मन उडू उडू झालं'(Man Udu Udu Jhala) ला हिंदी इंडस्ट्रीमधील तिच्या मित्र परिवाराने मनापासून शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री अर्चना पुरन सिंह, स्क्रिन रायटर किरण कोट्रियाल, निर्माते रमेश तौरानी, अभिनेत्री रुपाली गांगुली, कोरिओग्राफर- क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री चहल आदी हिंदी इंडस्ट्रीमधील मान्यवरांनी रीनाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले.