Hruta Durgule as a anchor in Sony Marathi New Show Singing Star

ऋता दुर्गुळे दिसणार ‘या’ नवीन भूमिकेमध्ये..

अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिची झी युवा वरील फुलपाखरू हि मालिका प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होती. या मालिकेने ऋताला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.  फुलपाखरू मालिकेनंतर हृताने व्यवसायिक नाटक “दादा एक गुड न्युज आहे” च्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण केलं. या नाटकाला देखील रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. फुलपाखरू मालिकेनंतर ऋता दुर्गुळे छोट्या पडद्यावर परत कधी दिसणार याबाबत प्रक्षकांमध्ये उत्सुकता होती. प्रेक्षकांची हि उत्सुकता आता संपली आहे.

Hruta Durgule Anchor in Sony Marathi Singing Star Show

ऋता दुर्गुळे आगामी ‘सिंगिंग स्टार’ या रिऍलिटी शो मध्ये अँकरच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ऋता सूत्रसंचालक म्हणून पहिल्यांदाच दिसणार आहे. या मालिकेत कोण कोण असणार आणि नेमकं स्वरूप काय असणार हे असून गुलदस्त्यात आहे.

Hruta Durgule Photos


या नवीन भूमिकेबद्दल ऋता म्हणाली “अँकर म्हणून मी आदी कधीच काम केले नाही, आणि माझासाठी हा अनुभव नवीन आहे. अश्या स्वरूपाच्या काही ऑफर्स मला आल्या होत्या पण मी त्याला न्याय देऊ शकेल कि नाही याबाबत मला खात्री नव्हती, परंतु दादा एक गुड न्यूज आहे या नाटक पासून माझा मध्ये विश्वास निर्माण झाला म्हणून मी हि अँकर ची भूमिका स्वीकारली आहे.

Singing Star Marathi Serial Anchor Hruta Durgule

Concept Credit – Marathi Manoranjan Vishwa

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *